मुंबई | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सकाळी निधन झाले. बाबासाहेब यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेबांना अखेरचा निरोप देताना मोठा जनसागर उसळला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.
गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. बाबासाहेबांना न्यूमोनिया होऊन वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले आहे. बाबासाहेबांनी २९ जुलै २०२१ रोजी वयाच्या शंभरीत पदार्पण केलं होतं. या निमित्त पुण्यातील कात्रज येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
Maharashtra | Last rites of notable historian and author Babasaheb Purandare held in Pune today with state honours. He passed away at Deenanath Mangeshkar Hospital of Pune this morning. pic.twitter.com/C7oVbE2T3Z
— ANI (@ANI) November 15, 2021
बाबासाहेबांनी जळपास सात दशके इतिहास संशोधनाचं कार्य केले आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा १९४१ मध्ये भारत इतिहास संशोधन मंडळात सहभागी झालं होतं. बाबासाहेबांना ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभलं होतं. तसेच बाबासाहेब हे पुणे विद्यापीठाच्या “मराठा इतिहासाची शकावली सन १७४० ते १७६४” भारत इतिहास संशोधन मंडळात पार पडलेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब संशोधक म्हणून देखील सहभागी झालं होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.