HW News Marathi
महाराष्ट्र

अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या परीक्षा रद्द, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्गाची परीक्षा होणार

मुंबई | कोरोनामूळे सध्या देशात तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. त्यामूळे दहावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. अंतिम सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

जे कॉर्स ३ वर्षांचे आहेत आणि ज्यात 6 सेमिस्टर आहेत. त्यांपैकी फक्त सहाव्या सेमिस्टरची परीक्षा घेण्यात येणार आहे. जिथे ८ सेमीस्टर आहेत तिथे आठव्या सेमीस्टर होणार, १० सेमीस्टर असतील तिथे १० व्या सेमीस्टरची परीक्षा घेणार आहोत. MA, एमकॉम आणि इतर २ वर्षांचा कोर्स आहेत चार सेमीस्टर आहेत तिथे चौथ्या सेमीस्टरची परीक्षा होणार आहे. डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. कालावधी सहा सेमिस्टरचा आहे. सहाव्या सेमीस्टरची परीक्षा होईल असंही सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

जूलैमध्ये या परीक्षा होणार असून सोशल डिस्टन्स पाळत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. वर्गात विद्यार्थांची संखअयाही कमी असणार आहे. तसेच, यु.जी.सीने दिलेल्या गाईललाईननुसार शेवटत्या सत्राच्या परीक्षा तातडीने रद्द करु शकत नसल्याने या परीक्षा घ्याव्या लागत आहेत असेही शिक्षणमंत्री उद्य सामंत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार गोपीचंद पडळकर नक्की मंत्री होणार ! सदाभाऊंनी व्यक्त केला विश्वास

News Desk

परमबीर सिंग यांच्या त्या आरोपासाठी अनिल देशमुखांची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk

आमची भाजपशी मैत्री, याचा अर्थ आम्ही सरकार बनवू असा नाही!

Arati More