HW News Marathi
महाराष्ट्र

लातूरमध्ये एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

मुंबई | एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पाचही विद्यमान नगरसेवकांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनीही आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे एमआयएमला हा मोठा धक्का मानला जात आहे.लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत एमआयएमला मोठे खिंडार पडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सय्यद ताहीर हुसेन, नगरसेवक जरगर शमशोद्दीन, नगरसेवक शेख फयाज नसोरोद्दिन, नगरसेवक हाश्मी इमरोज नुरोद्दीन, नगरसेवक इब्राहिम पटेल (नाना) यांच्यासह शेख अहेमद सातसैलानी, महंमदरफी भाई, सय्यद अन्वर हुसेन, शेख अजीम दायमी, शेख अबरार, सय्यद सोफी आदींनी प्रवेश केला. लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीच्या एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांचे जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते

या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे त्याला जातीयवादाने नव्हे तर धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू शकतो, असं पाटील म्हणाले. ल्पसंख्याक समाजातील मान्यवर नेते व कार्यकर्ते मधल्याकाळात भावनेच्या भरात एमआयएममध्ये गेले होते. त्या सर्वांच्या लक्षात आले की, एमआयएमचा दुरुपयोग भाजप सत्तेत टिकण्यासाठी करत आहे. भाजपाचे हितसंबंध जपण्यासाठी एमआयएमला उभं करुन अल्पसंख्याक समाजाची मते डिव्हाईड करुन भाजपचा विजय होण्यासाठी मदत होते आहे, हे लक्षात आले आहे. ही चूक पुन्हा होणार नाही म्हणून एमआयएममधील अनेक कार्यकर्ते, अनेक शहरात, जिल्हयात राष्ट्रवादीत येत आहेत. ही ताकद वाढत असताना अल्पसंख्याक समाजाने पाठिंबा दिला तर ही ताकद आणखी वाढायला मदत होईल, असे सांगतानाच आपल्या हितसंबंधांना बाधा पोचणार नाही. नगरपरिषदेत आपल्या हिताचे संरक्षण होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी! – उपमुख्यमंत्री

Aprna

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ! – देवेंद्र फडणवीस

Aprna

राज्याच्या महसुलात ऑगस्टमध्ये ३,७२४ कोटींनी झाली घट!

News Desk