मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज (२० एप्रिल) पुन्हा एकदा मुंबईतील गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सदावर्तेला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात मागणी केली होती. यानुसार, न्यायालयाने पोलिसांची मागणी मंजूर केली असून सदावर्तेंवर कोल्हापुरात मराठा समाजाबद्दल द्वेष निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस आर्थर रोडच्या दिशेने रवाना झाले आहेत.
न्यायालयात सदावर्तेंनी स्वतः कोर्टात बाजू मांडली असून यावेळी सदावर्तेंनी प्रत्येकी एसटी कर्मचाऱ्यांकडून २०० ते ३०० रुपये घेलल्याची मान्य केले. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पैशातून सदावर्तेंनी संपत्ती खरेदी केल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे. सदावर्तेंकडे जवळपास ४८ हजार पैसे जमा झाले. ऐवढे पैसे कोणता वकील घेतो, त्यांनी ते पोलिसांनी न्यायालयाला सांगावे. सरकारी वकिलांनी हर्षद मेहता केसचा दाखला दिला. यावेळी माझी केस कुठे आणि हर्षल महेताची केस कुठे असे सदावर्ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशातून संपत्ती खरेदी केली, सरकारी वकिलांचा आरोप
एसटी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या पैशातून सदावर्तेंनी परळ, भायखळ्यामध्ये मालमत्ता घेतली असून एक गाडी खरेदी केल्याचा आरोप सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केला. यावर सदावर्तेंवर म्हणाले, गाडी जुनी असून ती २०१४ मध्ये खरेदी केली आहे. माझ्या गाडीचा आरटीजीएस देखील आहे. गाडी खरेदी केल्यानंतर माझ्या अकाऊंटमधून पैसे गेले आहे. यांची माहिती तुम्हाला मिळेलच. यासाठी तुम्हाला माझ्या कस्टडीची गरच काय ?, परळमधील माझे घर २०१७ मध्ये घेतले असून ते घर वन रुम किचनचे आहे. याचा काय संबंध?, असा सवाल उपस्थित केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.