HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महापालिकेच्या शाळांचं नामांतर, ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाने ओळखल्या जाणार

मुंबई | मुंबईतील महापालिका शाळासंदर्भात मुंबई महापालिकेने बजेटमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शाळांचं नामांतर करण्याचा निर्णय आज (३ फेब्रुवारी) महापालिकेने घेतला आहे. इथून पुढे पालिकेच्या शाळा या मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखल्या जातील. महापालिकेच्या बजेटवेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

देशाच्या बजेटनंतर आता आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचं २०२१ आणि २०२२ चं वार्षिक बजेट जाहीर झालं. या बजेटमध्ये शिक्षण विभागासाठी २९४५ कोटींची तरतूद करण्यात आलीय. यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा करताना महापालिकेच्या शाळांच्या नामांतराची घोषणा करण्यात आली. आता पालिकेच्या शाळा या मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखलं जाणार आहेत.

बजेटमधील काही महत्त्वाचे मुद्दे –

शिक्षण विभागाचे २९४५ कोटींचा बजेट जाहीर झाले. तसंच येणाऱ्या काळामध्ये शिक्षण विभागात नवीन योजना आणणार. शाळांमध्ये कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर १९ आरोग्य विषयक अत्यावश्यक साधनांचा पुरवठ्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता सॅनिटायझर, साबण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या नवीन २४ माध्यमिक शाळा सुरू होणार

मुंबई महापालिका १० नवीन सीबीएसई शाळा सुरू करणार आहे. यासाठी बजेटमध्ये पैशांची तरतूद केली गेली आहे.मुंबई शहरात २, पश्चिम उपनगरात ३, तर पूर्व उपनगरात ५ अश्या एकूण १० शाळा सुरु करण्याचा मानस मुंबई महापालिकेचा आहे.

खासगी शाळांच्या अनुदानासाठी ३८० कोटी, शालेय वस्तूंचा मोफत पुरवठ्यासाठी ८८ कोटींची तरतूद, उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर कॉन्सिलींग कार्यक्रम Whatsapp आणि Chat bot द्वारे राबवणार असल्याचंही बजेटमधून सांगण्यात आलं आहे.

वैयक्तिक मार्गदर्शनासाठी मे २०२१ पासून ‘करिअर टेन लॅब’ या संस्थेमार्फत नियोजन आहे. ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याकरता मार्गदर्शन केलं जाईल. यासाठी बजेटमध्ये २१.१० लाखांची तरतूद केली गेली आहे. महापालिका शाळेतील १३०० वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम होणार असून त्यासाठी २८.५८ कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेमंच मुळात नकली, भाजपचा आरोप

News Desk

चला पुन्हा एकदा रामराज्य प्रस्थिपात करुयात, सुशांतच्या बहिणीचा सल्ला

News Desk

रावसाहेब दानवे लाटेवर निवडून आले, थोरातांचा भाजपला टोला

News Desk