HW News Marathi
महाराष्ट्र

थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, आज कोणता बॉम्ब फुटणार?

मुंबई | विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (९ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदंत फडणवीस हे राज्य सरकारवर कोणता बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मलिकांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे आजची पत्रकार परिषद महत्त्वाची आहे.

फडणवीसांनंतर राज्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषदंत घेणार आहे. यात मलिक एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडें यांच्यावर कोणते आरोप करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात दररोज मलिक हे वानखेडेंवर आरोपाच्या फैरी झाडत आहे.

मलिकांचं वानखेडेंच्या मेहुणीवर आरोप

नवाब मलिकांनी आज (८ नोव्हेंबर) पुन्हा वानखेडेंच्या मेहुणीवर पुण्यात ड्रग्ज केसची नोंद असल्याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. तसेच हे प्रकरण पुण्यात प्रलंबित असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. मलिकांच्या आरोपवर वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.हे प्रकरण जानेवारी २००८ मध्ये घडलं होतं. त्यावेळी मी सेवेतही नव्हतो आणि क्रांती रेडकरसोबत २०१७ साली विवाह झाला आहे. मग, या प्रकरणाशी कसा संबंध असू शकतो, असा सवाल वानखेडेंनी मलिकांना विचारला आहे. तसेच क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर मलिक हे दररोज वानखेडे यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत.

नवाब मलिकांचं ट्वीट

“समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर या ड्रग्जच्या व्यवसायात सहभागी आहेत का? तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्यावंच लागेल. कारण हर्षदा रेडकर यांच्याविरोधात केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे.” असे ट्वीट मलिकांनी केलं आहे. तसेच ट्वीटसोबत या प्रकरणातील काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहे.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी उद्यापासून स्टार्टअप सप्ताह; मंगल प्रभात लोढा यांची माहिती

Aprna

कोल्हापूरातील भाजपचा ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये दाखल,चंद्रकांत पाटलांना धक्का!

News Desk

वरिष्ठांचं ऐकून अजित पवारांनी RSSच्या सचिवांबद्दलचं ‘ते’ ट्विट केलं डिलीट !

News Desk