HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारला अद्यापही सूर गवसलेला नाही, फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

मुंबई | या सरकारला अद्यापही सूर गवसलेला नाही, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस महाविकासआघाडीला लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज (२३ फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. महाविकासआघाडीला स्थगिती सरकार असा उल्लेख करत शेतकरी, महिलांवरील अत्याचार, स्वातंत्रवीर सावरकरवर काँग्रेसची टीका, मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान आदी मुद्द्यांवरून फडणवीसांनी सरकारवर सरकारवर तोफ डागली.

दरम्यान, फडणवीसांनी म्हणाले की, “यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडीला स्थगिती सरकार असा उल्लेख करत शेतकरी, महिलांवरील अत्याचार, स्वातंत्रवीर सावरकरवर काँग्रेसची टीका, मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान आदी मुद्द्यांवरून त्यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएएला दिलेल्या पाठिंब्याबद्दल अभिनंदन केले. तसेच सुधीर मुनंगटीवार यांनी वनमंत्री राज्यात झालेल्या वृक्ष लागवडीवर महाविकासआघाडीच्या सरकार चौकशीचे आदेश दिले आहे.

तिन्ही पक्षात सुसंवाद नाही !

“सरकार स्थापन झाल्यापासून आम्हाला जेकाही पाहायला मिळाले. त्यामध्ये अद्याप तरी या सरकाला सूर गवसला नाही. या सरकारची दिशाही ठरत नाही. हे सरकार अत्यंत कन्फ्यूज्ड अशा प्रकारचे सरकार आहे. सरकारने आज आम्हाला चाहापान्याला बोलवावे. विरोधी पक्षाशी सुसंवाद साधण्यासाठी चाहापाणन्या बोलवायचे असते. पण, या पक्षातील तीन पक्षामध्येच संवाद नाही. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी तिन्ही पक्षांनी आपले चहापान करून एकमेकांमध्ये सुसंवाद स्थापन केला पाहिजे. यानंतर विरोधी पक्षाला संवाद करत बोलवायला पाहिजे, असे आमचे मत आहे. या सरकारने दिलेले एकही आश्वासन पुर्ण करताना दिसत नाही. सरकारने जाहीनामा आणि किमान समान कार्यक्रमामध्ये म्हटले होते. या सरकारने एक नवा पैसा शेतकऱ्यांना दिलेला नाही. कर्जमाफी नाही कर्जमुक्ती अशा प्रकराची युक्ती केल्यानंतर कुठलीही मुक्ती नाही माफी दिलेली नाही.”

सावरकरांच अपमान सहन करणार नाही !

छत्रपती आणि त्यांच्या वंशजांचा अपमान झाला यावर शिवसेना बोलायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात कारवाई करायला हवी अन्यथा किती दिवस असे सरकारमध्ये लाचारी पत्करणार असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. तसेच काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करत आहेत. आता महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या मुखपत्रात सावरकरांवर हीन दर्जाचे लेखन होत असेल. मात्र, त्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना एकही शब्द बोलत नाही. महाराष्ट्र आणि भाजप सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा धमकी वजा इशारा फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार वाढला आहे.
  • जनगणनेचा कायदा कठोर आहे. प्रश्नावली ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे.
  • जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही.जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय उत्तम काम केले, मी त्यांचे अभिनंदन करतो.
  • १९९९ पासून ते २०१९ पर्यंतच्या आर्थिक स्थितीवर सर्व निकष दाखवीत श्वेतपत्रिका नक्की काढली पाहिजे. खरे चित्र जनतेपुढे येईल
  • भीमा कोरेगाव आणि एल्गार हे वेगळे नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य
  • राम मंदिरासाठी ट्रस्ट तयार करावा, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मुस्लिम समाजाचे सर्व स्थळ हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात, हेही शरद पवारांना ठावूक आहे. तेथे ट्रस्ट नसतो. सध्या मुस्लिम मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे.
  • सावरकरांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर सन्मान करण्याचा प्रस्ताव विरोधक सादर करणार आहे
  • सरकारच्या चहापाण्यावर भाजपने बहिष्कार टाकला आहे
  • इंदिरा गांधीबद्दल काही बोले तर लगेच १० मिनिटात माफी मागितील जाते मात्र, सावरकरांबद्दल काही बोले तर काही बोले जात नाही.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून सतत अपमान करत आहे. तरी शिवसेनेने एक शब्द देखील काढत नाही, सावरकरांचा अपमाना भाजप सहन करणार नाही.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हा मध्यप्रदेशात झाला यावर शिवसेना एकही शब्द बोलायला तयार नाही, याबद्दल कोणते शब्द बोलयला आणि कारवाई करण्यास शिवसेना तयार नाही, खुर्चीसाठी विचार सोडणे हे कितपत योग्य आहे हे मुख्यमंत्र्यांना करावा लागेल.
  • सीएए आणि एनपीआर यासंदर्भता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे फडणवीसांनी स्वागत केले आहे
  • मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरावे पाहिल्यानंतर बहुधा एनआयएला एल्गार परिषदेचा तपास सोपविल्याबद्दल अभिनंदन केले
  • हे सरकार स्थगिती सरकार असल्याची भावना आता गावोगावी निर्माण झाली आहे
  • या सरकारकडून राज्यातील अनेक प्रकल्पांना स्थिगिती दिली जात आहेत
  • पोलीस विभागाचे सरकार खच्च कर करत आहे, त्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढत आहेत
  • महिलांवर अत्याचार वाढत आहे, या सरकारने महिलांसंदर्भात कठोर कायदे करायला पाहिजे. यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू
  • राज्य सरकारकडून महाविकासआघाडीकडून विश्वासघात केला, याचा पडदाफाश आम्ही या अधिवेशनात करू
  • पीक कर्जव्यतिरिक्त सरकारकडून कुठलेही कर्जमाफी नाही
  • जाहीरनाम्यातील एकही आश्वासपूर्ण झालेले नाही
  • हे सरकार दिशाभूल करत आहे
  • या सरकारकडून शेतकऱ्यांना ना कर्जमाफी, ना कर्जमुक्ती मिळलेली नाही
  • सरकारने एक नवा पैसा शेतकऱ्यांना दिलेला नाही.
  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महाविकासाघाडी फसवणूक करत आहे
  • सरकारमधील तिन्ही पक्षांनी आधी संवाद साधावा
  • या सरकारला सूर गवसला नाही
  • महाविकासआघाडी सरकारमध्ये संवाद नाही, हे सरकार कन्फ्यूज्ड आहे
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनापूवी भाजपची पत्रकार परिषद
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : पुण्यातील शाळा बंद, शक्य असेल तर कर्मचाऱ्यांनी घरातून काम करा !

swarit

‘राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील’, शरद पवारांचं वक्तव्य!

News Desk

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या मुलाला ED कडून समन्स

Aprna