HW News Marathi
महाराष्ट्र

वाझे प्रकरणात शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी होऊ द्या, NIA तर आलीच आता CIA किंवा KGF ला बोलवा!

मुंबई | अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि या सगळ्या प्रकरणात सोमर येत असलेलं नाव म्हणजे पोलिस अधिकारी सचिन वाझे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी NIA करत असून सचिन वाझे यांना निलंबितही करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील या घडामोडीचा राजकारणावर गंभीर परिणाम झाला आहे. शिवसेनेची प्रामुख्याने यात प्रचंड कोंडी झाली आहे. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज (२० मार्च) ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे की, सचिन वाझे प्रकणात शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी होणार असेल तर होऊ द्या, असं ठामपणे त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर ते असंही म्हणाले की, NIA तर आलीच आता CIA किंवा KGF ला बोलवा!

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरु आहे. तपासाचा भाग म्हणून सचिन वाझे यांना शुक्रवारी रात्री अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर आणण्यात आलं होतं. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएकडून या ठिकाणी नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला.एनआयएने सचिन वाझे यांना स्कॉर्पिओ सापडली तिथपर्यंत चालायला लावलं. आधी सचिन वाझेंना शर्ट आणि पँटमध्ये चालायला सांगण्यात आलं. नंतर त्यांना कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून चालायला लावण्यात आलं. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि सचिन वाझे यांच्यातील साधर्म्या तपासण्याचा प्रयत्न एनआयकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण; अमरावतीत राजकाणर सुरू, नवनीत राणांचे समर्थकांसोबत घोषणाबाजी

Aprna

राजकारणाची पातळी खालावली, रोज उठून पाहावे लागते, आज कोणाचा नंबर? संजय राठोड यांचा आरोप!

News Desk

शेतकरी संपाची तीव्रता अधिक वाढली

News Desk