HW News Marathi
महाराष्ट्र

सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय विचार करून घेऊ – विजय वडेट्टीवार

मुंबई | सरकारने महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबतच्या प्रस्तावावर विचार करण्यात येत आहे. आता चर्चेअंती निर्णय घेता येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर क्षेत्राकरिता लोकल सेवा सुरू करण्याबाबत विविध व्यावसायिक संघटना आणि प्रवासी संघटना आणि मध्य तसेच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत मंत्रालयात काल आढावा बैठक घेण्यात आली.

सध्या फक्त अत्यावश्यक सेवा वगळता महिलांसाठी सकाळी ११ ते ३ आणि संध्याकाळी ७नंतर प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार, घरेलू कामगार तसेच अन्य लोकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन हाच पर्याय आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत सध्या विविध क्षेत्रांतील लोकांशी चर्चा करून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याबाबतही शासनाचे प्रयत्न सुरू आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे आवश्यक आहे. परंतु कोरोनाचा प्रसार रोखणेही तेवढेच महत्‍त्वाचे आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे याबाबी ही महत्त्वाच्या आहेत. जितकी अर्थव्यवस्था महत्त्वाची तितकेच लोकांचे जीवन महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कडक शिस्तीचे प्रशासक’ उपमा देत जयंत पाटलांनी नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा

News Desk

Welcome 2022 : नव्या वर्षात ‘या’ गोष्टी महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Manasi Devkar

राज्यसभा खासदार फौजिया खानही अन्नत्याग करणार, शरद पवारां पाठोपाठ घेतला निर्णय

News Desk