HW Marathi
महाराष्ट्र

टी-१ वाघिणीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातारण

यवतमाळ | नरभक्षक (टी-१) वाघिणीला वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून ठार करण्यात यश आले आहे. या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. त्यानंतर टी-१ वाघिणीला ठार केल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून हा आनंद साजरा केला आहे.

या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आता या वाघिणीचा मृतदेह नागपूरमध्ये पाठवण्यात आला आहे. या वाघिणीने आतापर्यंत तब्बल १४ जणांचा जीव घेतला असून गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. काल रात्री टी-१ नरभक्षक वाघीण शोधपथकाच्या नजरेस पडल्यानंतर तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते.

प्रथम तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु दाट झाडी-झुडुपांमुळे ते अयशस्वी ठरले, त्यानंतर गोळी घालून वाघिणीला ठार करण्यात आले, ही माहीत इतकी गुप्त ठेवण्यात आले होते.मात्र ती पथकाच्या दिशेने येताच शार्प शूटर अजगर अलीने तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. या वाघिणीचे ११ महिन्यांचे दोन बछडे आहेत. त्यांनाही शोधण्यासाठी आता वन विभागाकडून पर्यटन केले जातील. या शोध मोहिमेसाठी हवाई शोध घेण्यासाठी पॅरामिटर,चार हत्ती, पाच शार्पशुटर, ५०० वन कर्मचारी व खासगी कर्मचारी एवढ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता.

Related posts

घराला घरपण देणाऱ्या डिएसकेंचे तुरुंगातील फोटो व्हायरल

News Desk

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

News Desk

साताऱ्यात ऐतिहासिक भवानी तलवारीची मिरवणूक

News Desk