HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात

लोणावळा | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज (४ जानेवारी) सकाळी सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट बॅगा घेऊन जाणारा ट्रक हा आडोशी बोगदा पार करुन जात होता. त्याचदरम्यान समोरील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक मुंबई लेनवरुन पुणा लेनवर पलटी झाला. यावेळी हा भीषण अपघात झाला.

अपघातानंतर ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून लांबच लांब वाहनांचा रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच खोपोली व बोरघाट पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते, आयआरबी व डेल्टा फोर्सचे कर्मचारी व देवदूत पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत मृत व जखमींना वाहनांमधून बाहेर काढत जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त वाहने व रस्त्यावर पसरलेले सिमेंट बाजुला करण्याचे काम सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गोसीखुर्द’च्या पाण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

Aprna

“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

News Desk

“वाझेंना नेमकं कोण भेटतं होतं? त्याचा तपास व्हावा”, कॉंग्रेसची मागणी  

News Desk