HW News Marathi
महाराष्ट्र

“उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार”, हर्षवर्धन पाटील आणि उदयनराजेंमध्ये झाली चर्चा

सातारा |सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा मराठा समाजामध्ये नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकीकडे संभाजीराजे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू असताना दुसरीकडे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. काल (१ जून) हर्षवर्धन पाटील यांनी उदयनराजे यांची भेट घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली. यावरून भाजपने ठाकरे सरकारला घेरले असून, आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते व मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मराठा समाजातील प्रमुख लोकांशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली.

उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार – हर्षवर्धन पाटील

उदयनराजे यांनी ट्विट करून हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीविषयी माहिती दिली. तर हर्षवर्धन पाटील यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आपण उदयनराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय झालेला आहे. या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आंदोलनबाबत पुढाकार घेण्यास ते तयार आहेत, असे पाटील यांनी सांगितले आहे.

संभाजीराजे आणि फडणवीस यांच्यात चर्चा

संभाजीराजे छत्रपती यांना भाजप डावलत आहे का? असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांना विचारला असता, संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आहे. संभाजीराजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्व राजकीय पक्ष, तसेच संघटनांना भेटत आहेत. आम्ही भाजप म्हणून सवतासुभा मांडलेला नाही. त्याची गरजही नाही. हे आंदोलन राजकीय पक्षांचे नाही, समाजाचे आहे. समाजासाठी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आरक्षण कसे मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार

दरम्यान, मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १० टक्के आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण मिळणार असून, या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला १० टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता, तसा निर्णय सरकारने घेतला होता. आता मात्र मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा निर्णय सरकारने दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे, झेपेल तर पुढे जा!

News Desk

छायाचित्रकार हा पोलिसांचा तिसरा डोळा – पो. नि. पडवळ 

News Desk

अहेरी शहरातील सुसज्ज बाजारवाडीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk