HW News Marathi
महाराष्ट्र

डोंबिवलीमध्ये द. आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीला कोरोना, नव्या व्हेरियंटची लागण झाली की नाही?

मुंबई | दक्षिण आफ्रिका, हांगकांग, आणि युरोपी देशामध्ये ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने काल (२८ नोव्हेंबर) मंत्रीमंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. “कुछ नही होता यार” असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो, असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणी, जिनोम सिवेन्सिंग चाचणी आणि त्या प्रवासाचा इतिहासाची देखील नोंदवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे.

ठाणे जिल्ह्यातील डोंबविलीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून एक रहिवाशी आला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा फैलाव हा दक्षिण ऑफिकेत झाला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने या व्यक्तीला नव्या कोरोनाची लागण झालेली आहे की नाही. यासाठी त्या व्यक्तीचे नमुने जिनोम सिवेन्सिंग चाचणीसाठी पाठविले आहे. यानंतर त्या व्यक्तीला ओमिक्रॉन झाला की नाही हे निष्पन्न होईल.

हा रहिवाशी बुधवारी (२४ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधून डोंबिवलीत आले. यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ते सध्या पालिकेच्या संस्थात्मक विलीनीकरणात ठेवले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या व्यक्तीने दक्षिण आफ्रिकेतून आल्यावर दिल्लीनंतर मुंबई असा प्रवास केल्याची माहिती पालिकेकडून मिळाली आहे. या व्यक्तीच्या कुटुंबियांची आणि ज्यांच्या संपर्गात आलेल्या व्यक्तींची चाचणी केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालपाणी कमवण्याकरता ‘हे’ सर्व लोक एकत्र आले आहेत !

News Desk

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रमेश थोरात यांना पुन्हा संधी मिळणार का?

News Desk

आर्यन खानला आजही मिळाला नाही जामीन; गुरुवारी होणार जामिनावर सुनावणी

News Desk