HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढील सुनावणीपर्यंत दोघांचा मुक्काम कारागृहात

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्न खासदार नवनीत राणा यांना वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याच्या जामिनावर २९ एप्रिलला होणार आहे. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणांचा आर्थर रोड कारागृहात मुक्काम असणार आहे. तातडीने जामीनावर सुनावणी घेण्यास वांद्रे न्यायालयाने नकार दिला आहे. आणि सरकारी पक्ष २७ एप्रिलला आमचे लेखी म्हणणे मांडण्याचा सांगितले आहे. न्यायालयीन कोठडीनंतर राणा दाम्पत्याचा जामीनासाठी अर्ज करणार आहे. राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसावरून झालेल्या नाट्यानंतर पोलिसांनी काल (२३ एप्रिल) अटक केले होते. 

राणा दाम्पत्याविरोधात राणा दाम्पत्यावर १२४ (अ) सेडिशन अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिली आहे. प्रदीप घरत यांनी म्हटले, “मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचे असेल तर परवानगी गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्ध वापरुन त्यांनी चॅलेंज केले. राणा दाम्पत्यांनी नोटिशीला न जुमान त्यांनी शासनाला आव्हान दिले. यामुळे राणा दाम्पत्याविरोधात १२४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे सरकारी वकील प्रदीप घरात यांनी सांगितले. 

राणा दाम्पत्यांची सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी आंदोलकांवर करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी आंदोलन मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली. राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेले कलमावर मर्चंड यांनी आक्षेप घेतला असून त्यांच्या अटकेला केला. तसेच मर्चंटने पोलीस कोठडी देण्यास विरोध केला पोलिसांनी राणा दाम्पत्यांच्यावर दुसऱ्या बाजुला एफआयआर नोंदवली असून ३५३ आयपीसीचा आरोप केला. तर दुसरी एफआयआर नोंदवली असल्याचे राणा दाम्पत्यांचे वकील मर्चंट यांनी म्हटले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्या ‘भुंकऱ्या’ अँकरला सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ करणाऱ्यांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे – सामना 

News Desk

‘आपल ते बाब्या, दुसऱ्याच ते कारट’ नीलम गोऱ्हे यांची भाजपावर सनसनीत टीका!

News Desk

शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना! – डॉ. नीलम गोऱ्हे

Aprna