नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज (२१ डिसेंबर) राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात दिली आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. महात्मा फुले योजनेतून शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र त्यानंतर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडणाऱ्या भाजपने सभात्याग केला आहे. ७/१२ कोरा करण्याचा शब्द सरकारकडून पाळण्यात आला नाही, असा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray in state legislative assembly: Loans of farmers up to Rs 2 lakhs to be waived off. Money to deposited in the banks directly. Scheme to implemented from March. (file pic) pic.twitter.com/MxQ99GMBI7
— ANI (@ANI) December 21, 2019
Opposition has staged walk out from the Maharashtra legislative assembly demanding complete waiver of farmers' loans, after Chief Minister Uddhav Thackeray's announcement of farm loan waiver. https://t.co/J02XZ3Mv3m
— ANI (@ANI) December 21, 2019
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.