HW News Marathi
महाराष्ट्र

BMC निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज आरक्षणाची सोडत केली जाहीर

मुंबई | महाराष्ट्रात १४ महानगर पालिका निवडणुकीसाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर केला आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोजाने आज (३१ मे)  १४ महानगर पालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, राज्यातील महानगर पालिकेत कोणता वॉर्ड अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले ते जाहीर झाले आहे. यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग क्रमांक २०६ हा सर्वसाधारण झाला आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा ११७ क्रमांकाचा प्रभाग महिलेसाठी आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात आली.

दरम्यान, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा ९६ प्रभाग सुद्धा महिलेसाठी आरक्षित झाला आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षणाची आज सोडत पार पडली असून ही सोडत मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झाली. महाराष्ट्र निवडूक आयोग जाहीर केलेला सोडतीनुसार ६०, ८५, १०७, ११९, १३९, १५३, १५७, १६२, १६५, १९०, १९४, २०४, २०८, २१५ आणि २२१ हे प्रभाग अनुसुचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.  तर अनुसूचित जमाती महिलासाठी १२४ वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच अनुसुचित जातींतील महिलांसाठी १३९, १९०,१९४, १६५, १०७, ८५, ११९, २०४ हे प्रभाग राखीवर आहेत. यामुळे विद्यामान पुरुष नगरसेवकांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. 

महिलांसाठी 53 वॉर्ड आरक्षित


प्राधान्यक्रम 1 (53 )प्रभाग क्रमांक- २, १०, २१, २३, २३, २५, ३३, ३४, ४९, ५२, ५४, ५७, ५९, ६१, ८६, ९०, ९५, ९८, १००, १०४, १०६, १०९, १११, ११८, १२१, १२२, १३४, १४४, १४५, १५०, १५६, १५९, १६९, १७०, १७१, १७२, १७५, १७८, १८२, १८४, १८९, १९१, १९२, २०१, २०२, २०५, २०७, २१२, २१३, २१८, २२९, २३० आणि २३६. 

प्राधान्य क्रम २ (33) प्रभाग क्रमांक- ५, २८, २९, ३९, ४५, ४६, ६४, ६७, ६९, ७४, ८०, ९२, १०३, १२०, १२५, १३१, १४२, १४७, १५१, १६३, १६८, १७७, १८१, १८६, १८७, १९६, २२०, २२५, २२६, २२७, २३१, २३३ आणि २३४ 

सर्वसाधारण महिला आरक्षित (२३) प्रभाग क्रमांक – ४४, १०२, ७९, ११, ५०, १५४, १५५, ७५, १६०, ८१, ८८, ९९, १३७, २१७, १४६, १८८, १४८, ९६ , ९, १८५, १३०, २३२ , ५३ 

Related posts

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर डेटाबॉम्ब, पोलीस बदलीच्या रॅकेटचा मांडला तपशील डेटा!

News Desk

“आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा”; भाजपचा ठाकरेंवर निशाणा

News Desk

गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक!

News Desk