नवी दिल्ली | मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तृळात प्रचंड गोंधळ झाला आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांचीसुद्धा बदली करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या गोटातही खळबळ झाल्याचे दिसून आले आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, या सगळ्या विषयांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (१९ मार्च) भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६ जनपथ या दिल्लीतील बंगल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी १० वाजताच्या सुमारास दाखल झाले होते. शरद पवार सध्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली येथे आहेत. गृहमंत्री आणि शरद पवारांच्या या भेटीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती जरी झाली असली तरी पुढे या प्रकरणात काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, गेले काही दिवस राष्ट्रवादीच्याच पक्षातील काही नेते अडचणीत आल्याचं दिसून आल्याने पक्ष प्रमुख म्हणून शरद पवार आता काही ठोस भूमिका घेणार का याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Delhi: Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrives at the residence of NCP Chief Sharad Pawar pic.twitter.com/jXsTYD3dQB
— ANI (@ANI) March 19, 2021
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणारच – अनिल देशमुख
अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या. त्यामुळे आता निष्पक्ष चौकशीसाठी मुंबईच्या आयुक्तांसह राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आता अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून योग्यपणे सुरु आहे. या चौकशीत जे सत्य समोर येईल त्यानंतर राज्य सरकार दोषींवर कारवाई केली जाईल. कनिष्ठ किंवा वरिष्ठ दर्जाचा कोणताही अधिकारी असो त्याच्यावर कारवाई होईल, अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.