HW News Marathi
देश / विदेश

‘प्रवाशांचे प्रमाणपत्रं तपासण्यासाठी राज्य सरकारने स्वत:ची यंत्रणा उभी करावी’, दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

नवी दिल्ली | १५ ऑगस्ट पासून लोकल सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव यांनी घेतला आहे, मात्र त्यासाठी काही अटी लागू केल्या आहेत. जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याचं स्वागतच आहे.

काही प्रमाणात लोकल सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्या प्रमाणे आणि राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे येत्या १५ ऑगस्टपासून आम्ही काही प्रमाणात लोकल सुरू करू. कोरोनाची स्थितीही आता आटोक्यात आली आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वेशी थोडी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. पण तरीही सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रतिसाद देईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

रेल्वेची भूमिका स्पष्ट आहे. प्रवासी तपासून आत सोडण्यात येईल. आम्ही लोकल सुरू करण्यास सज्ज आहोत. मात्र, प्रवाशांचे प्रमाणपत्रं तपासण्यासाठी राज्य सरकारनेही स्वत:ची यंत्रणा उभी केली पाहिजे. ही राज्याचीही जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. आमची कसली नाराजी नाही. उलट आम्ही खूश आहोत. ज्या अडचणी येतील त्या चर्चेतून सोडवता आल्या असत्या, असंही ते म्हणाले आहेत.

क्यूआर कोड तपासण्याची जबाबदारी कोणाची?

रेल्वेने प्रवास करण्यासाठी क्यूआर गरजेचं असणार आहे. रेल्वेच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड आणि पास तपासले पाहिजेत असं सांगत राज्य सरकारवर जबाबदारी ढकलली आहे. “राज्य सरकारलाच ही तपासणी करावी लागणार आहे. दोन डोस घेतलेल्यांचा रेकॉर्ड सरकारकडेच आहे. सत्यता पडताळण्यासाठी रेल्वेकडे अशी कोणती यंत्रणा नाही. प्रवास करणाऱ्यांसाठी राज्य सरकारनेच तपासण्याची योजना करावी. ही राज्य सरकारची यंत्रणा आहे त्यामुळे त्यांनीच ओळख पटवावी. रेल्वे त्यांना सुरळीत प्रवास करु देईल,” असं त्यांनी म्हटलं आहे. ही घोषणा फार आधी व्हायला हवी होती. पण आमच्याकडून स्वागत आहे असंही ते म्हणाले आहेत.

काय आहेत नवीन अटी?

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सकारात्मक! देशात पहिल्यांदाच समलिंगी न्यायाधीश होण्याची शक्यता

News Desk

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लक्ष्मण रेषा पाळा, पंतप्रधानांचे भारतीयांना आवाहन

swarit

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदारांना सभापती वैंकय्या नायडूंनी केले निलंबित 

News Desk