HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय!

औरंगाबाद | राज्यात चुरशीच्या ठरलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा त्यांनी हा विजय मिळवला आहे. सतीश चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली असुन त्यांचा पराभव झाला आहे.

सतीश चव्हाण यांनी या निवडणुकीमध्ये ५७ हजार ७९५ मतांची आघाडी घेतली आणि सलग ३ वेळा जिंकण्याची बाजी मारली आहे. या निवडणूकीत २ लाख ४१ हजार ९०८ जणांनी मतदान केले होते. सतीश चव्हाण यांना २ टर्मची पोचपावती मिळाली आहे. दरम्यान, औरंगाबाद मध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी करण्यात गुंतले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम जन्मभूमीच्या संघर्षातील नेत्यांवरील ठपका पुसला गेला!

News Desk

देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्याबद्दल प्रेमाची भावना दिसतेय त्याबद्दल आनंद आहे, आयकर नोटीसीवरून पवारांचा टोला

News Desk

इव्हीएम हॅकचे निवडणूक आयोगाचा दावा फोल

News Desk