मुंबई। राज्यात आज ३ हजार ३०७ कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढ झाली आहे. तर आज (१७ जून) ११४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ५६५१ वर गेली आहे. तसेच आज १ हजार ३१५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५९१६६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख १६ हजार ७५२ वर पोहोचली आहे. राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५१ हजार ९२१ आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
राज्यात आज 3307कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 116752 अशी झाली आहे. आज नवीन 1315 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59166 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 51921 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 17, 2020
राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. राज्यात ५ लाख ८२ हजार ६९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५४५ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार ५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात ११४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७८ (मुंबई ७७, मीरा भाईंदर १), नाशिक- ११(जळगाव ७, नंदूरबार २, मालेगाव २), पुणे- २२ (पुणे ३, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड १), लातूर-२ (लातूर २), अकोला-१ (यवतमाळ १).
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८८ पुरुष तर २६ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७६ रुग्ण आहेत तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या ११४ रुग्णांपैकी ८४ जणांमध्ये (७३.७ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५६५१ झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.