HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत ओमायक्रॉनचे ३ रुग्ण, तर शहराच्या हद्दीत कलम १४४ लागू

मुंबई | महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १७ वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मुंबईत काल (१० डिसेंबर) ३ ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहे. तर पिंपरी-चिचंवडमध्ये ४ नवे रुग्ण आहेत. मुंबईच्या हद्दीत ११ आणि १२ डिसेंबरला कलम १४४ लागू झाल्यामुळे आता दोन दिवस कोणतेही मोर्चे आणि निदर्शने करण्यास बंदी आहे.

दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. परंतु मुंबईत कलम १४४ लागू असल्यामुळे मोर्चे आणि निदर्शने करण्यास बंदी आहे. यामुळे मुलुंड चेक नाक्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जलील हे मुस्लिम आरक्षण, वक्क बोर्डाच्या जमिनी आणि इतर अन्य मागण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे.

मुंबईत ओमायक्रॉनचे तीन रुग्ण सापडले आहे. मुंबईतील ३ रुग्णांपैकी एक ४८ वर्षीय असून तो रुग्ण टांझानियावर ४ डिसेंबर आला होता. या रुग्णांची ओमायक्रॉनचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला. या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असून खबरदारी म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरा रुग्ण २५ वर्षीय व्यक्ती असून १ डिसेंबरला लंडन येथून देशात दाखल आला. त्यावेळी कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे. आणि तिसरा व्यक्ती ३७ वर्षीय असून तो दक्षिण आफ्रिकेतून ४ डिसेंबर रोजी आला आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्यांचं थेट साताऱ्यात जाऊन अजित पवारांना आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर….

News Desk

चंद्रकांत पाटील यांचे दावे म्हणजे फक्त बोलण्याच्या गोष्टी !

News Desk

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat