HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येईल; मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं विधान

दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवार, 6 एप्रिल) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. या भेटीनंतर शरद पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. एकतर काल (5 एप्रिल) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर सुद्धा पवारांची ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात होती. तसेच राऊतांवरील कारवाईनंतर लगेचच मोदी आणि पवारांची भेट झाली. त्यामुळे त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.

केंद्रीय तपास यंत्रणा करत असलेल्या कारवाईमुळे सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार चांगले चालले आहे. पुढील अडीच वर्षांने निवडणुका होतील तेव्हाही हेच सरकार येईल, असा स्पष्ट विश्वास शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या भेटीत राज्यातील राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या प्रलंबित १२ आमदारांचा विषय आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय यंत्रणेने केलेल्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर घातल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत हे राज्यसभा सदस्य आहेत. शिवाय ते सामनाचे ज्येष्ठ संपादक आहेत. त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणेने कारवाई केली आहे याबाबत पंतप्रधानांना अवगत केले. त्यावेळी पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली नाही परंतु यावर ते गंभीरतेने विचार करतील व योग्य ती पाऊले उचलतील असेही शरद पवार म्हणाले. संजय राऊत यांच्यावर केंद्रीय यंत्रणेने कारवाई का केली? काय गरज होती असा सवालही यावेळी शरद पवारांनी केला.

केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करते त्यावेळी त्याची जबाबदारी पंतप्रधानांची असते. त्यामुळे हा विषय त्यांच्या कानावर घातला असेही शदर पवार यांनी स्पष्ट केले. कोण काय बोलतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि कुणाच्या बोलण्यावरून भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. राज्यातील तिन्ही पक्षाने केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात पाऊले उचलली आहेत आणि उचलत राहणार आहोत असेही पवारांनी स्पष्ट सांगितले.

सध्या राज्यातील मंत्रीमंडळात कोणताही बदल करण्यात येणार नाही असे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी सांगितले. युपीए अध्यक्ष पद आम्ही मागितलेले नाही. हे पद घ्यायला मी तयार नाही हे कितीतरी वेळा सांगितले आहे, असेही पवारांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध, अजित पवार यांची ग्वाही

Aprna

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

swarit

कोरोनाचा प्रादुर्भाव घटला, पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्या, आंबेडकरांची मागणी!

News Desk