HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकारकडून मंत्र्यांची प्रकरणं दाबली जातात, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोरील अडचणी आता वाढण्याची चिन्हे आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करणार आहेत. त्यासंदर्भात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्र सोडले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई का नाही, असे म्हटले. तसेच, महाविकास आघाडी सरकारकडून मंत्र्यांवरील आणि पक्षातील नेत्यांवर असलेल्या आरोपांची प्रकरणं दाबण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं. धनंजय मुंडे प्रकरणात कुठलिही कारवाई झाली नाही, एका मंत्र्यांच्या जावयाला ड्रग्जमध्ये पकडलं, त्यावरही कारवाई नाही. एका मंत्र्याने कार्यकर्त्याला घरी जाऊन मारतो, त्याचीही कारवाई नाही. एका पक्षाच्या युवक अध्यक्षावर बलात्काराचा आरोप असूनही कुठलिही कारवाई झाली नाही.मात्र, पूजा चव्हाण प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ यांच्या पतीची चौकशी आत्ताच का सुरू होतेय, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

तसेच, कार्यकर्त्यांवर, पक्षाच्या नेत्यांवर अशाप्रकारच्या कारवाई करुन, आम्ही घाबरणार नाही. चित्रा वाघ या वाघीण आहेत, भाजपा पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठिशी आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.चित्रा वाघ यांनीही लाचलुचपत प्रकरणात पतीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या नवऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जातो. मलाही काही प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता नवी माणसं उभी करून माझ्यावरही काही गुन्हे दाखल होतील. मात्र मी याला घाबरत नाही. आता मीच तुम्हाला पुरून उरणार. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानच चित्रा वाघ यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी केलं मोदींचं कौतुक!

News Desk

गणेश विसर्जनाची ही पद्धत कोणती?, नवनीत राणा झाल्या ट्रोल

Manasi Devkar

चौकशीत बाधा येऊ नये म्हणून आयुक्तांची बदली केली – गृहमंत्री

News Desk