HW News Marathi
महाराष्ट्र

गोदापार्कचा पॅटर्न पुण्यात राबवण्याचा राज यांचा मनोदय

पुणेः नाशिकमध्ये गोदापार्क उभारून विकास केल्याच्या गप्पा मारणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक पॅटर्न पुण्यात राबवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पुणे शहरातील नदीपात्राचा विकास आराखडा ठाकरे यांनी मंगळवारी सादर केला. नाशिकमधील नदी पात्रालगत केलेल्या कामाचा दाखला देत त्यांनी मुळा-मुठा नदीपात्राचा विकास शक्य असल्याचे म्हटले आहे. नदीपात्रालगतच्या विकासाचा आराखडा मुख्यमंत्र्यांना देखील दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विकास कामात सरकारकडे पैसे नसतील तर उद्योजकांच्या सहकार्याने शहराचा विकास करणे शक्य आहे. पण यासाठी उद्योजकांना कामासंदर्भात विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सादर केलेल्या विकास आराखड्यामध्ये बालगंधर्व ते म्हात्रे पूल नदीपात्राच्या विकास प्रकल्पासाठी ८४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील ३४० कोटी सीएसआरच्या माध्यमातून उभे करण्यात येतील. या प्रकल्पाच्या देखभालीसाठी महिन्याला सव्वा कोटी खर्च येणार असून, या प्रकल्पामुळे ३ कोटींचा महसूल दरवर्षी मिळेल, असा विश्वास राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज ठाकरेंचा चौथ्यांदा पुणे दौरा!

News Desk

सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या जलसंधारण प्रकल्पांच्या सीमा निश्चितीची  प्रक्रिया पूर्ण करावी! – अब्दुल सत्तार

Aprna

एकनाथराव खडसे व रोहिणीताईं पासून माझ्या जीवाला धोका; शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

Aprna
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

Aprna

मुंबईत टीबीने रोज मरतात १८ जण; महिला सर्वाधिक

News Desk

राज्यात ‘कोरोना’ उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित

News Desk