HW News Marathi
क्राइम

मंदाकिनी खडसे यांना तूर्तास दिलासा…

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढलेल्या पहायला मिळाल्या होत्या. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात अनेक चोकशा देखील झाल्या होत्या. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकीनी खडसे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सत्र न्यायालयाने मंदाकीनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

त्यांनी ईडीला तपासकार्यात सहकार्य करावे असे निर्देश

पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यांना अधीही अटक केलं जाण्याची शक्यता होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर न्यायालयात आज सुनावणी घेण्यात आली. यामध्ये मंदाकिनी खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या कालावधीत त्यांनी ईडीला तपासकार्यात सहकार्य करावे असे निर्देश कोर्टाने दिले.

ईडीच्या कारवाईनंतर त्यांची लगेच जामिनावर सुटका होईल. तसेच 17 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत मंदाकिनी खडसे यांना प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. येत्या 21 ऑक्टोबरला मंदाकिनी खडसे यांनी विशेष न्यायालयासमोर हजर राहण्याचेदेखील आदेश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अंतरिम दिलासा दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यायालयाने ‘या’ कारणामुळे कुख्यात डॉन अरुण गवळीला दिला पॅरोल

Aprna

धारावीत फायरिंग एकजण ठार

News Desk

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा आवळून खून

News Desk