HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने फेटाळला पत्नी मंदाकिनी खडसेंचा अटकपूर्व जामीन अर्ज

पुणे | पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण, आता मुंबई सत्र न्यायालयाने खडसे यांना आणखी एक दणका दिला आहे. न्यायालयाने खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सत्र न्यायालयाकडून मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे, खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, आज (१२ ऑक्टोबर) स्वतः एकनाथ खडसे देखील सत्र न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत.

एकनाथ खडसे हे सध्या बॉम्बे रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आज खडसेंच्या वकिलाने न्यायालयात याबाबतची माहिती दिली आणि न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी खडसेंना वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्याप्रमाणे, न्यायालयाकडून खडसे यांना उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. तर, आता २१ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या मतानुसार, खडसेंचे जावई गिरीश चौधरींच्या अटकेनंतर स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंनाही अटक होण्याची शक्यता आहे.

अरे भाजपवाल्यांनी माझे हाल केले!

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात काहीच दिवसांपूर्वी जुंपली होती. “माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच आहे. हे मला कालच समजलं. अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता? राष्ट्रवादीत या. नाथाभाऊला महाराष्ट्रात बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. पण नाथाभाऊ त्यांना भारी आहे. गिरीश महाजनांना मी आव्हान देतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही १० कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत”, असा दावा करत खडसे यांनी गिरीश महाजनांवर जोरदार निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यात भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. ३० डिसेंबर २०२०ला खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने क्वॉरंटाईन व्हावे लागले होते. आता उद्या क्वॉरंटाईन काळ संपल्यावर खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. जमीन व्यवहार या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना २०१६ मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे शरद पवारांना समन्स बजावण्याची मागणी

swarit

महाराष्ट्राचा आकडा १८९५, मुंबईत आढळले आणखी १३४ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

“मनसेने लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य करू नये”, मनसेच्या ‘त्या’ आरोपाला राष्ट्रवादीचे उत्तर  

News Desk