HW News Marathi
महाराष्ट्र

विरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात !

नाशिक | शिवसेनेचे नेते आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपाची वाट धरत असताना विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी केला आहे. भविष्यात अनेक जण शिवसेनेत येतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. त्यामुळे येत्या काळात विरोधी पक्षातील किती आणि कोणते आमदार शिवसेनेत जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

“एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करत भविष्यात अनेकजण शिवसेनेत येतील”, असा दावाही यांनी केला आहे. यापूर्वीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे भाजप सेनेच्या वाटेवर नक्की किती नेते आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच विधनसभा निवडणुकीच्या जागेसंदर्भातील निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असं शिंदेंनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करू द्यायचा कट पंतप्रधानांनी रचलाय ! | जयंत पाटील

News Desk

मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे! 

News Desk

सचिन वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला – सामना

News Desk