HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजाच काय अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, राऊतांचा दावा

मुंबई | “पंकजाच काय अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात,” असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांनी आज (२ डिसेंबर) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पंकज मुंडे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले की, पंकजाच काय अनेक जण शिवसेनेच्या वाटेवर असून पंकजा मुंडे संदर्भात १२ डिसेंबरला कळेल, असे सूचक विधान देखील राऊतांनी यावेळी केले. राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पंकजा मुंडेंच्या शिवसेनेचा प्रवेशावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

तसेच माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर सध्या भाजपचा उल्लेख नाही, मुंडेंच्या ट्विटर हँडलवरील बायोमधून त्यांनी भाजपमधील पदाचा उल्लेख हविण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांनी काल (१ डिसेंबर) फेसबुक पोस्ट लिहून, १२ डिसेंबरला भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची जन्मदिवस असून या दिवशी सर्व कार्यकर्त्यांना गोपीनाथगडावर भेटू, असे आव्हान केले आहे.

पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्टमध्ये नेमके काय म्हटले

निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.

दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले.

‘आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.

पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. “ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,” ..”ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या “…किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…

आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.

12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?

12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !!

येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!!

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्री करा- छत्रपती संभाजीराजे

News Desk

मराठी भाषा ही ज्ञानभाषा असायला हवी – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

अंत्ययात्रेदरम्यान पूल कोसळून २५ जण नदीत कोसळले

News Desk