मुंबई | मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाने गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात गेलेल्या वारकऱ्यांना घरी परतण्यास कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून सातारा, पुणे, पंढपूर आणि मुंबईला बंदमधून वगळण्यात आले असल्याची माहिती मराठा मूक मोर्चा समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिली आहे.
Aurangabad: Maratha Kranti Morcha workers continue their protest over death of a person who died after jumping off a bridge into Godavari river yesterday during 'jal samadhi agitation' in the district for reservation for Maratha community in govt jobs & education. #Maharashtra pic.twitter.com/NmoHE0eQik
— ANI (@ANI) July 24, 2018
या बंदाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून मराठवाड्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. या आंदोलक कार्यकर्ता काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.