HW News Marathi
महाराष्ट्र

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर गोवऱ्या पेटवल्याने खळबळ, मराठा आरक्षणाचे साताऱ्यात पडसाद

सातारा | मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. त्याचे पडसाद साताऱ्यात उमटू लागले असून राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर अज्ञाताने गनिमी कावा करत शेणीच्या गोवऱ्या पेटवून टाकल्याने खळबळ उडाली. पोवई नाका येथील कोयना दौलत या निवासस्थानी सकाळी १०.३० च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाच्या काचा देखील अज्ञातांनी फोडल्या असून कार्यालयाबाहेर देखील शेणीच्या गोवऱ्या आढळून आल्या आहेत.

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर अज्ञाताने हा प्रकार केल्याचे समजत आहे. साताऱ्यातील घरासमोर शेणीच्या गोवऱ्या पेटवण्याचे कारण अद्याप समजलेले नसले तरी मराठा आरक्षण रद्द झाल्यानेच हा प्रकार समजण्यात येत आहे..गोवऱ्या पेटवणारे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करणारे अज्ञात कोण होते हे समजू शकलेले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनेकदा जेलवारी केलेले गुजरातचे भले ‘मोठे’ गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत !

News Desk

वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवरील वाढीव GST रद्द करावा; अजित पवारांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

Aprna

“…तर अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा अमृता फडणवीसांची ठाकरेंवर विखारी टीका”

News Desk