HW News Marathi
महाराष्ट्र

परळीत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा एल्गार!

बीड | जून २०१८ मध्ये पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या परळी येथील तहसील कार्यालयाच्या समोरील मैदानात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तब्बल २१ दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे सरकार राज्यात सत्तेत होते आणि या आंदोलनाची मशाल संबंध महाराष्ट्रात पेटली होती. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले मात्र सप्टेंबर २०२० मध्ये अचानक मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली.

अस्थिर झालेल्या मराठा समाजाच्या लॉकडाऊनच्या काळात ही परिस्थिती उदभवल्यामुळे काही ठिकाणी मुलांनी आत्महत्या करण्यास सुरू केले.महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाच्या आरक्षणावर स्थगिती आल्याने आज परत परळी येथील तहसील कार्यालयाच्या समोरील मैदानावर मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने मराठा आरक्षण मिळण्यासाठी आज आंदोलन करण्यात सुरु झाले आहे.

परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली आणि नारेबाजी करत जयघोष करत ही रॅली परळी तहसील कार्यालयाच्या समोरील मैदानात धडकली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत – देवेंद्र फडणवीस

News Desk

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची समिती यादी जाहीर

News Desk

मुंबई, ठाण्यातील खड्ड्यांच्या राजकारणावरुन चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा!

News Desk