HW News Marathi
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात मटक्याने पाय पसरले

सांगली | दिवंगत नेते आर आर पाटील (आबा) जेव्हा राज्याचे गृहमंत्री असताना सांगली जिल्ह्यातून मटका हद्दपार केला होता.परंतु त्याच सांगली जिल्ह्यात मटका तेजित आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील आमदार व खासदार यांच्या गावातच मटका जोरात चालू आहे. काल (२९ सप्टेंबर) खासदार संजयकाका पाटील यांच्या चिंचणी गावातच सांगली पोलिसांनी छापा मारून जवळ जवळ ६५ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जत,कवठेमहांकाळ,खानापुर,आटपाडी, तासगाव,पलूस,कड़ेगाव,वाळवा,शिराळा म्हणजे जिल्ह्याच्या एका टोका पासून ते शेवटच्या टोका पर्यत मटका चालूआहे. स्थानिक पोलिसांना हप्ते चालू असतात. त्यामुळे स्थानिक पोलिस छापा मारत नाहीत. त्यासाठी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी विशेष पथक नेमले आहे. पूर्ण जिल्ह्यात हे पथकच धाडी मारते. मटका बंदीसाठी आमदार खासदार व पोलीस अधिकारी यांनी प्रबोधन करण्याची गरज आहे. तरच लाखो संसार उध्वस्त होत आहेत. त्यामुळे मटका आणि जुगार या दोन्ही गोष्टींचा खेळ जुगारी बेवडयांचे लोकप्रिय शब्द म्हणजेच …… खेळ तुमचा, नशिबही तुमचेच. असा शब्द उदयास आला आहे.

असाच प्रत्यय आता सांगलीतही येत आहे. काही ठिकाणी मटका ओपन तर काही ठिकाणी क्लोज झालाय. म्हणजेच ठराविक ठिकाणी खुलेआम (ओपन ) चालू आहे. अन् ठराविक ‘ ठिकाणी बंद (क्लोज ) आहे. जिल्ह्यातील मटक्याचे केंद्रबिंदू सांगली व तासगाव झाले आहे. या हितूने सर्व मटक्याचे व्यवहार होत आहेत. मटका बुकीला ‘ या ‘ साहेबांचे स्कॉड, ‘त्या ‘साहेबांचा हप्ता, नवीन आलेले साहेब ऐकत नाहीत, थोडं वाढवून द्या, असे सांगत काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या हप्तेगिरीने आणि अभयाने मटका धंदा जोरात सुरू असून इथला प्रत्येक जुगारी बेवडा स्वतःचे नाव, गाव विसरेल परंतु कल्याण-मुंबईच्या मटका एक्सप्रेसचा आनंद घेण्यास कुठेच कमी पडत नाही. पूर्ण सांगली जिल्ह्यात आता जिल्ह्याबाहेरील मटका बहाद्दरांनी अतिक्रमण करायला सुरुवात केले आहे. मिरज शहरात तर मटक्याची होम डिलीव्हरीची सोय आहे.आकडा घ्यायला येणार, पैसेही द्यायला येणार…व्वा,क्या बात है. काहीजण खास मटका प्राध्यापक आहेत. त्यांच्या जुगारी बेवडे तयार करण्याचा जणू काय या मटका प्राध्यापकांनी वसाच घेतल्याचे समजते.

तरुणाई वाम मार्गाला लागली अाणि राजकारण्यांची आता खरच भूक भागली. निवडणूकीत मटका लावायला, दारु आणायला , दारू पाजायला आणि एखादया सज्जन कार्यकर्त्यांना हे सर्व करायला लावणाऱ्यांना आता बौध्दिक क्षमता ढासळणाऱ्या तरुणाईला बेवडे झालेले पाहून खरच आपली भूक भागली काय असं वाटू लागलं.

मटक्याच्या आकड्यावर नशीब आजमावून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत. लपून छपून चालणारा मटका आता मात्र डोकाऊ पाहत आहे.जुगारी माणसांची प्रवृती अशी असते की आपण जी हार पत्करली आहे. ती उदया नक्कीच भरून येईल. म्हणून तो पुन्हा मटक्याच्या नादात जे काही आहे-नाही ते सर्वच गमावून बसतो. या मटका खेळणाऱ्यांच्या संसाराची होणारी ही राख रांगोळी कोण थांबवणार ? हप्ता घेणाऱ्या गावच्या पोलीस पाटलांपासून ते साखळीमध्ये गुंतलेल्या अधिकाऱ्यांनो संसाराची राखरांगोळी होत असलेल्या ‘ त्या ‘ मातेचा तळतळाट तुम्ही हप्ता घेवून तुमच्या वाटयाला का घेताय ? आता या चालू असलेले अवैध धंदे थांबले पाहिजे या दृष्टीने पोलिसांनी कठोर कार्यवाही करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे. तर आता मटक्यावर प्रबोधन करण्याची गरज आहे.व माणुसकी म्हणून स्थानिक पोलिसांनी पुढाकार घेउन मटका बंदीवर पावले उचलण्याची गरज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकमेकांविरोधात कुरघोड्या करा मात्र जनतेला वेठीस धरू नका आशीष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

News Desk

MarathaReservation | संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांनी दिलं निमंत्रण

News Desk

काँग्रेसचे दिग्गज नेते चंद्रकांत रघुवंशी, संजय देवतळे यांच्या हाती शिवबंधन

News Desk