HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत काय चर्चा झाली?

मुंबई | महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची काल (१० ऑगस्ट) संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जवळपास साडेतास चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ‘वर्षा’वर उपस्थित होते. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची देखील उपस्थिती होती

या बैठकीत राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्य सरकारचे काही महत्त्वाचे निर्णय, कोरोना संबंधित उपाययोजना यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख या बैठकीसाठी उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान’!, नवाब मालिकांचा संताप

News Desk

चौकशी अधिकारी छळ करत आहेत ! रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात धाव

News Desk

“ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका”, नितेश राणेंनी डिवचले

News Desk