HW Marathi
महाराष्ट्र मुंबई

एमएचटी-सीईटी परीक्षा १-२० ऑक्टोबरपर्यंत घेतली जाणार !

मुंबई | राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकललेल्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याआधी ९ ऑगस्टला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने जाहीर करण्यात आले होते. एमएचटी-सीईटीच्या परीक्षा आजपासून १ ते २० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. ही परीक्षा २ टप्प्यांत घेतली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात पीसीबी (फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजी) ग्रुपची परीक्षा असून ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यातील १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ या तारखांना तर दुसऱ्या टप्प्यात पीसीएम (फिजिक्स-केमिस्ट्र-मॅथ्स) ग्रुपच्या परीक्षा १२, १३, १४, १५, १६, १९, २० या तारखांना होणार आहेत.

या एमएचटी-सीईटीसाठी पीसीएम ग्रुपच्या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ५० हजार ८९ विद्यार्थी तर परराज्यातून १६ हजार १८ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. पीसीबीसाठी अधिक विद्यार्थी असून १ लाख ९५ हजार २७५ विद्यार्थी आहेत. त्यापैकी राज्यभरातील १ लाख ९२ हजार ७५ आणि राज्याबाहेरचे ३२०० आहेत. पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी राज्यातून ८९ हजार ८४५ तर परराज्यातून ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Related posts

धर्मा प्रोडक्शनच्या क्षितीज प्रसाद यांना एनसीबीकडून अटक

News Desk

सरकार काम करते हे विरोधकांना पचत नाही !

अपर्णा गोतपागर

अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण

News Desk