HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्री धनंजय मुंडेंकडून राजीनामा घ्यावा, शरद पवारांकडून हीच नैतिकता अपेक्षित ! | चंद्रकांत पाटील

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या मुद्द्यावरून चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. “रेणू शर्मा आणि करुणा शर्मा ही दोन वेगळी प्रकरणे आहेत. रेणू शर्मा प्रकरणाची चौकशी सुरूच राहील. पण करुणा शर्माप्रकरणी धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा”, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. धनंजय मुंडेंच्या राजीनामान्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर यावेळी महाराष्ट्रासह देशभरातील मंत्र्यांना कसा राजीनामा द्यावा लागला होता, याची उदाहरण देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे कि, “१९८४मध्ये माजी मंत्री रामराव आदिक यांनी विमानात एका हवाईसुंदरीचा हात धरला होता. १४ मंत्र्यांनी त्यावेळी त्यांना साथ दिली होती. मात्र, तरीही दबाव वाढल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. माजी राज्यपाल एन. डी. तिवारी यांची ३ महिला मसाज करत असल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. राजस्थानचे मंत्री महिपाल मदेरणा यांना नर्स असलेल्या भंवरी देवींचे अपहरण केल्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. तर, राजस्थानचेच मंत्री बाबूलाल नागर यांना बलात्कारप्रकरणी घरी बसावे लागले होते. आपचे समाजकल्याण मंत्री संदीप कुमार यांचीही अश्लील सीडी व्हायरल झाल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर त्यांच्याच एका माजी सहकाऱ्याने आरोप केल्याने अकबर यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले होते”, अशी अनेक उदाहरणे देत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून हीच नैतिकता अपेक्षित आहे”, असे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेच्या शाळांचं नामांतर, ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाने ओळखल्या जाणार

News Desk

OBC Reservation: आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी

News Desk

विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ‘मांजरचेष्टा’ करतो!; संजय राऊतांचा प्रहार

News Desk