मुंबई | राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मलिकांची तब्यात ठिक नसल्यामुळे त्यांना आज (२ मे) जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिकांची आज अचानक तब्यात बिघडल्याने त्यांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेहण्यात आले. मलिकांना ईडीने दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी अटक केली असून मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मलिकांनी दाऊतची बहिण हसिना पारकर यांच्याकडून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप केला असून त्यांनी मलिकांना ही जमीन ५५ लाखाला मिळाली होती. या जमिनीची सध्याची किंमत ३०० कोटीची असल्याची माहिती ईडीच्या तपासातून मिळाली आहे. यात गैरव्यवहारच्या पार्श्वभूमीवर ईडीने मलिकांना २३ फेब्रुवारी सकाळी त्यांच्या घरावर धाड टाकून चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेहण्यात आले होते. यानंतर पीएमएलए न्यायालयाने मलिकांना ईडीच्या कोठडीत सुनावली.
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.