HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष

मुंबई । राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत सापडले आहे. मंगळवारी (२३फेब्रुवारी) तब्बल १५ दिवसांनंतर संजय राठोड पोहरादेवी येथे माध्यमांसमोर आले. तर आज (२४ फेब्रुवारी) झालेल्या कॅबिनेट बैठकीला हजेरी लावल्यानंतर थोड्याच वेळात संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी संजय राठोड आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार असून या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

मुख्य म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या संपूर्ण प्रकरणी प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणी संजय राठोड यांना पाठीशी घालणार की त्यांचा राजीनामा घेणार याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी आज सह्याद्री अतिथिगृहावर कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर संजय राठोड मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा येथे गेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे – उदयनराजे भोसले

News Desk

‘खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’, आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

News Desk

“पुरंदरेंना भेटतो ते शिवशाहीर म्हणून, ब्राह्मण म्हणून नाही” – राज ठाकरे

News Desk