HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार रवी राणा यांना रॅलीदरम्यान आली भोवळ

मुंबई | आमदार रवी राणा हे पंधरा दिवसांनंतर अमरावतीमध्ये आले होते. यामुळे रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी निषेश रॅली काढत त्यांचे स्वागत केले आहे. राणा यांनी जयस्तंभ चौकात त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अभिवादन केले. यानंतर रवी राणा यांची निषेध रॅली संपली असताना. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर रवी राणा यांना भोवळ आली. तसेच पटियाला जिल्हा सत्र न्यायालयाने रवी राणा यांना आठवडाभराचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

अमरावतीमधील राजापेठ पोलिसांनी पालिका आयुक्तांवर शाई फेक केल्याप्रकरणी त्यांच्यावर रवी राणासह १० जणांविरुद्ध ९ फेब्रुवारी कलम ३०७ व अन्य कलमा आंतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. राणांना फेब्रुवारी रोजी ‘ट्रान्झिट ॲन्टिसिपेट्री बेल’ मंजूर झाल्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, रवी राणा हे ‘ट्रान्झिट ॲन्टिसिपेट्री बेल’ विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  राणा हे अमरावतीत आल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांच्या घोळक्या असताना त्यांना अचानक भोवळ आली. यानंतर रेडियंट रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिथे डॉक्टरांकडून योग्य उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्यांच डॉक्टरांनी सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण

आम्ही समस्त शिवप्रेमी आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. यानंतर महापालिकेने विना परवानगी पुतळा बसवल्यामुळे १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला.अमरावतीच्या राजापेठ येथील उड्डाण पुलावर पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा आमदार रवी राणा यांनी बसवला होता. यामुळे अमरावतीत राजकारण तापले. यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्री पदाच्या बदलीच्या चर्चेवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

चांगल्या निर्णयालाही शिवसेनेच्या मंत्र्यांचा खोडा – संभाजी पाटील-निलंगेकर यांचा आरोप

News Desk

“विद्यार्थी रडतोय, पवार साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला न्याय द्या”, विदयार्थ्यांची पवारांना साद

News Desk