HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर कोणताही वचक नाही, ते अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच व्यस्त !

मुंबई | “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रशासनावर कोणताही वचक नाही. सध्या ते फक्त कोणता प्रशासकीय अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्यांची इच्छुक विभागात बदली करून घेण्यात व्यस्त आहेत”, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. “ग्राउंड लेव्हलला काय परिस्थिती आहे हे मुख्यमंत्र्यांना घरात बसून कळणार नाही. त्यासाठी लोकांमध्येच जावं लागतं. त्याशिवाय प्रश्न समजत नाहीत. मात्र, उद्धव ठाकरेंना हे कधी कळणार आहे ? लाखोंच्या नोकऱ्या गेल्या त्यांच्यापुढे कसं जीवन जगायचं ? हा प्रश्न आहे. यात उद्धव ठाकरे काय करत आहेत ? ते सर्वसामान्यांना कधी दिलासा देणार ?”, असे अनेक प्रश्नही संदीप देशपांडेंनी यावेळी उपस्थित केले आहेत. ‘मनसे’सह भाजप नेत्यांकडून राज्य सरकारला धारेवर धरण्यात आले आहे.

‘टीव्ही 9’चे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कोरोनाने झालेल्या मृत्यूनंतर आता शासन-प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देखील संदीप देशपांडेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.”महाराष्ट्र सरकाने कोरोनाच्या काळात ओरबाडण्याचे काम केले आहे. पत्रकार पांडुरंग रायकर हे त्याचे एक उदाहरण आहेत. अशी अनेक उदाहरणे राज्यात पाहायला मिळत आहेत. अँब्युलन्स मिळाली नाही, बेड नाही, प्रत्यक्षात रुग्णांना उपचार मिळाले नाही, अशा लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. कोरोनाच्या नावावर राज्य सरकारने फक्त ओरबाडण्याचे काम केले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील जंबो कोरोना सेंटरचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. मात्र, त्याचा काहीही उपयोग नसून हे सेंटर म्हणजे निव्वळ नावाला उभारले तंबू आहेत”, असे म्हणत संदीप देशपांडेंनी सरकारला धारेवर धरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना नगरसेविका काळाच्या पडद्याआड, रणरागिणी सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

News Desk

कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होण्याचे प्रमाण मोठे, सोमय्यांनी राज्यापालांकडे मांडली व्यथा

News Desk

चिंतादायक! मुंबईत आज तब्बल ३ हजार ६७१ नवे कोरोना रुग्ण

Aprna