HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली. राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर त्यांनी आज (१७ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबरोबरच महाराष्ट्र दिनी संभाजीनगरमध्ये सभा घेणार असल्याची माहिती दिली. या दोन महत्वाच्या घोषणा करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतल्याची राज ठाकरेंनी दिली. राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून पुन्हा “३ तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविले नाही. तर तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, “येथे एका मुस्लिम पत्रकारांनी आमच्या बाळा नांदगावकर यांना भेटले. त्यांनी सांगितले की, नुकतंच मला लहान मूलं झालं, भोंग्याच्या आवाजामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर मी मशिदीत जाऊन भोंगा बंद करण्यास सांगितलं. यावरुन दिसून येते, भोंग्याचा त्रास फक्त हिंदुनांच नाही, तर मुस्लिमांनाही देखील होतो. त्यामुळे भोंग्याचा त्रास फक्त हिंदुंना होत नाही तर मुस्लिमांनाही होतो. यामुळे भोंग्याचा सामाजिक आणि धार्मिक विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे. पाच वेळा जर भोंगे लावला तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू. देशातल्या सर्व हिंदू बांधवांनी माझी विनंती आहे की, तुम्ही तयार रहा. आता रमजान सुरू आहे, म्हणून काही करायचे नाही. ३ तारखेपर्यंत भोंगे बंद झाले नाही तर जशास तसे उत्तर देऊ.”

महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याची इच्छा नाही, पण भोंग बंद करा. पाच वेळा जर भोंगे लावला तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू. पुढील सभा ही १ मे रोजी संभाजीनगरमध्ये घेणार आहे.राज ठाकरे पुढे म्हणाले, “देशातील सर्वोच्च न्यायालय आणि कायद्यापेक्षा स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर मला वाटते की लाऊड स्पिकर वाटत असेल, तर त्यांना जशास तसे उत्त देण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याची इच्छा नाही, पण भोंग बंद करा, माणुसकी म्हणून मुस्लिम धर्मियांनी विचार करावा, प्रार्थनेला विरोध नाही. १ मे रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार आणि जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची त्यांनी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग

Aprna

राष्ट्रवादीचा विराट सभांचा विक्रम, आता कोकणावर स्वारी

News Desk

कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत!

News Desk