HW News Marathi
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीत बसलेल्या धक्क्याचा ‘मनसे’ने थेट कोकणात घेतला बदला

मुंबई | येत्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेने डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे. अवघ्या २४ तासांमध्ये मनसेचे २ बडे निष्ठावंत नेते पक्ष सोडून गेले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी (१ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर आज (२ फेब्रुवारी) कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते मंदार हळबे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, मनसेने याचा वचपा कोकणात काढल्याचे पाहायला मिळाले आहे.

खेड तालुक्यातील मेटे गावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केल्याचे वृत्त आहे. खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शाखा अध्यक्षसह शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. खरंतर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या निष्ठावंत अशा २ नेत्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेची हा एक अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे मनसेने कोकणात याची कसर भरून काढल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले राजेश कदम हे मनसेच्या स्थापनेपासूनचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत ते विद्यार्थी सेनेपासून कार्यरत असल्याने त्यांचा शिवसेना प्रवेश धक्कादायक मानला जात आहे. तर दुसऱ्याच दिवशी कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते तसेच केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलेले आणि १० वर्षांपासून नगरसेवक असलेले मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेसाठी डोंबिवलीत एकीकडे अस्वस्थ वातावरण असताना कोकणात मात्र दिलासादायक स्थिती आहे.

‘मनसे’ने नेमला डोंबिवलीचा नवा शहराध्यक्ष

‘मनसे’ला धक्का देत राजेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत ‘मनसे’ने डोंबिवलीचा नवा शहराध्यक्ष नेमला आहे. ‘मनसे’च्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची निवड झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी कुणाचाही बाप काढला नाही – चंद्रकांत पाटील

News Desk

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ‘ही’ नियमावली!

News Desk

महाराष्ट्रात आणीबाणी लावा! महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याने लिहिलं चक्क मोदींना पत्र

News Desk