HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार संभाजीराजे नविन पक्ष काढा ! कोणी केली मागणी ?

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर सध्या खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत.हा प्रश्न सोडवण्यात प्रस्थापित पक्षांना येत असलेले अपयश बघून आता समाजामधील काही लोक संभाजीराजेंनी नवीन पक्ष काढावा असा आग्रह धरत आहेत. सोशल मिडीयावर अनेकांनी तशा पोस्ट टाकायला सुरूवात केली आहे. संभाजीराजेंचा पाठीशी सर्व सामान्य जनता ठामपणे उभी राहील,असे काही जणांना वाटतयं.

संभाजीराजे काय भूमिका मांडणार ?

आज सायंकाळी ५ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका मांडणार आहेत.त्यामुळे ते खासदारकीचा राजीनामा देणार का ?नविन पक्ष काढणार का याचर्चांना ऊत आला आहे.

संभाजीराजेंच्या भेटींचं सत्र !

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार संभाजीराजे सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. आज (२८ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखिल उपस्थितीत होते. त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेणार आहेत.आज (२८ मे) १२ वाजता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजेंनी महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतली. मराठा आरक्षणावर या दोघांशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेत आपली भुमिका मांडणार आहेत.

शरद पवार-संभाजीराजे भेटीमध्ये काय झालं ?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप खासदार संभाजीराजे हे देखील आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी काल (२७ मे) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट सकारात्मक झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे नारायण राणे या सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा”, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार संभाजीराजे देखील पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, संभाजीराजे यांनी गुरुवारी (२७ मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या आहेत.

संभाजीराजेंनी शरद पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची घेतली भेट

राज ठाकरेंच्या भेटींनंतर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात-पात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत. माझ्या भूमिकेला ते समर्थन देखील करतात. माझे पणजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे जिवलग मित्र होते. छत्रपती घराण्याचं आणि ठाकरे घराण्याचं ते नातं आजही आहे. शिवाय किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन या मुद्द्यावर देखील आमचं एकमत आहे. त्यामुळे त्याबाबत देखील आमची चर्चा झाली”, असे संभाजीराजे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीत कांड : पीडित तरुणीची प्रकृती गंभीर, उद्या आणखी एक शस्त्रक्रिया

News Desk

जलयुक्त शिवार अभियान, पाणी टंचाईवर कायमची मात

News Desk

महाविकासआघाडी सरकार माझ्यावर पाळत ठेवतयं, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप!

News Desk