HW News Marathi
Covid-19

खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारली कोरोनामुळे अनाथ झालेल्या २ चिमुकल्यांची जबाबदारी

पुणे। सर्वत्र कोरोनाचा कहर अगदी भयावह आहे, कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे. अनेक बालके अनाथ झाली आहेत, अनेकांनी आपले प्राण गमावले. अशातच कोरोनामुळं अनाथ झालेल्या दोन मुलींचं पालकत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं आहे.

सोशल मीडियाच्या माध्यामातून बातमीची दखल घेत सुप्रिया सुळे यांनी जेजुरीयेथील अनाथ झालेल्या दोन मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आता घेतली आहे. याविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, ही धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेत या दोन्ही मुलींना मदत करणं हे कर्तव्य आहे. या मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आमचं कुटुंब घेत आहे. सुप्रिया सुळे पुढे बोलतांना म्हणाल्या की, जेजुरीतील आमचे सहकारी दिलीपदादा बारभाई तातडीने कोणालातरी तिथे पाठवत आहेत. चौकशी करुन त्यांच्या आजी-आजोबांना सुरक्षित वाटेल त्या ठिकाणी घेऊन जाता, आणि त्यांची जबाबदारी आम्ही घेत आहोत.

जेजुरीमधील घोणे कुटुंबातील साडे चार वर्ष आणि दीड वर्ष लहानग्या दोन मुलींच्या आई-वडिलांचे कोरोनामुळे निधन झालं. त्यामुळे या दोघींची जबाबदारी आजी-आजोबांवर पडली. ही बातमी सुप्रिया सुळे यांनी समजतात माणुसकी धर्म निभावत या चिमुकल्यांची स्विकारली .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना बैठक सुरु  

News Desk

मोदींच्या लेह भेटीसाठी खोटे रुग्णालय उभारले?

News Desk

“राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?”, राज ठाकरेंचा मोदींना सवाल

News Desk