HW News Marathi
Covid-19

फडणवीस साहेब, थोडे शांत बसा आणि सरकारचे काम बघत रहा !

मुंबई | ‘फडणवीस साहेब, थोडे शांत बसा आणि सरकारचे काम बघत रहा’, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ट्वीट करत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लागावला आहे. फडडणवीस यांनी नुकत्याचे पत्रकार परिषदेत महाविकासआघाडी सरकारच्या कामाची माहिती विरोधकांनी दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला होता.

राज्याची कोरोनाची परिस्थिती महाविकसाघाडी सरकारला योग्य पद्धतीने हाताळता येत नसल्याचा ठपका विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. हसन मुश्रीफ ट्वीटमध्ये म्हणाले, “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. त्यांना ‘मौनंम सर्वार्त साधनम्’, ‘मौनव्रताने मनाची शांती लाभते’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय,’ अशी तीन पुस्तके भेट देणार आहे. फडणवीस साहेब थोडे शांत बसा आणि सरकारचे काम बघत रहा,” असा टोला लगावला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन तेंडुलकरनंतर आता युसुफ पठाणलाही कोरोनाची लागण

News Desk

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण

News Desk

लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटींची गरज – अदर पूनावाला

News Desk