HW News Marathi
महाराष्ट्र

दाभोलकर हत्याकांड : वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना सीबीआयकडून अटक

मुंबई | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणी वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना आज (२५ मे) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) यांनी अटक केली आहे. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मागच्या सहा वर्षांपासून तपास सुरु आहे. या दोघांचा या हत्याकांडात काय सहभाग होता, हे अद्याप तर समजू शकले नाही.

दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली मुंबई उच्च न्यायालयाने हत्याकांडातील आरोपींची बाजू मांडणारे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना उद्या (२६ मे) सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संजीव पुनाळेकर मुंबई उच्च न्यायालयात वकील असून हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यासारख्या अनिष्ट रुढी परंपरांविरुद्ध लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राज्य पोलीस आणि सीबीआयचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते.

पाच वर्ष या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नव्हती. मागच्यावर्षी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली होती. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविड काळात असंघटित कामगार, एकल महिलांसाठीच्या उपाययोजनांबाबत ठाणे जिल्ह्याने केलेल्या कामगिरीचा डॉ.नीलम गोऱ्हेंनी घेतला आढावा

Aprna

हो माझी चूक झाली, कायद्यानुसार जरुर कारवाई करा, इम्तियाज जलील यांचा ‘त्या’ कृत्यावर माफीनामा  

News Desk

“गुन्हेगारापेक्षाही वाईट वागणूक राणा दाम्पत्यांना दिली,” फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Aprna