HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही हक्काची घरे मिळणार

मुंबई | मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून तहान, भूक विसरुन घरातील जेवणाचा डबा आपल्याकडे वेळेत पोहचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लवकरात लवकर हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश उमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांचे कौशल्य, त्यांची मेहनत काय असते हे पाहण्यासाठी देशभरातून लोकं येत असतात. इतकेच नव्हे तर त्यांना मार्गदर्शन देण्यासाठीही अनेक अभ्यासक येतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असावी. त्यासाठी मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

दरम्यान, गेल्या १३० वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं पवार यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर मुंबईचे डबेवाले हा नावलौकक कायम राहावा. तसेच मुंबईचे डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. दरम्यान, मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी, ‘बहुतांश डबेवाले हे पुण्याचे आहेत आणि उपमुख्यमंत्रीही पुण्याचे असल्याने त्यांना आमचे प्रश्न माहिक आहेत. मागच्या सरकारमध्ये जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडेही डबेवाल्यांच्या घराबद्दल मागणी केली होती पण ती पुर्ण झाली नव्हती पण आता नक्कीच ती पूर्ण होईल. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या भाषणात जाहीरपणे डबेवाल्यांना घरे देऊ असे आश्वासही दिले होते’. अशी माहिती त्यांनी दिली.

Related posts

फेसबुकवर पोस्ट टाकून मराठा तरुणाची आरक्षणासाठी आत्महत्या

डबेवाल्यांमध्ये प्रसिद्धीसाठी चढाओढ

News Desk

जळगाव-पुण्याला मिळाले नवे पालकमंत्री

News Desk