HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली

मुंबई | मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. महाड ते केंबुली दरम्यान पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे. यामुळे कोकण आणि मुंबई दोन्ही दिशेला मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दोन जेसीपी व एका क्रेनच्या सहाय्याने दरडीचा ढिगारा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अशी माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेच प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दरड कोसळली असल्याचे म्हटले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी घेतली मोहन भागवतांची भेट

News Desk

नवरात्र उत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी !

News Desk

ती गेली …आणि खासदार उदयनराजे भोसलेही हळहळले…

News Desk
महाराष्ट्र

तासगाव ढवळी येथे बेकायदेशीर वाळू साठा जप्त

swarit

सांगली | तासगाव तालुक्यात वाळू चोरीचे नवनवीन फंडे पहायला मिळत आहेत. पण तासगाव तालुक्यातील ढवळी येथील अर्जुन कोळी यांच्यावर यापूर्वी देखील वाळू चोरीचे गंभीर गुन्हे आहेत. अर्जुन कोळी या वाळू उपसा करणा-या व्यक्तीच्या घराजवळ वाळू साठा असल्याची टीप तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले यांना मिळाल्यानंतर गोपनीय रीत्या पथक पाठवून त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी सदर ठिकाणी तब्बल येरळा नदीतील 10 ब्रास वाळू साठा आढळून आला आहे. तो जप्त करून तहसिल कार्यालयात आणण्यात आला.

सदर वाळू साठा अनधिकृत असल्याने संबंधित व्यक्तीला 5 लाख इतका दंड ठोठाविण्यात आला आहे. अर्जुन कोळी संबंधित व्यक्तीला वाहनासाह हजर करण्याबाबत तासगाव पोलीस स्टेशन ला वॉरंट बजावणी करणेबाबत कळविण्यात आले आहे. तर यापुढे अनधिकृत वाळू उपसा करणा-या वाहतुकदारांचे कंबरडे मोडून काढणार असल्याचे सुधाकर भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या महिन्यात अंदाजे 30 लाख रुपये वाळू मधील दंड महसूल विभागाकडे जमा करण्यात आला होता. त्यानंतर या महिन्यातली ही दुसरी मोठी कारवाई असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Related posts

जेट एअरवेजमध्ये बाळ जन्मलं

News Desk

ईडीचे अधिकारी भाजपची ATM मशीन! – संजय राऊत

Aprna

सदाभाऊंचे मंत्रिपद कायम

News Desk