HW News Marathi
Covid-19

“तुझ्या बापाला” हे ट्विट मी नव्हे तर एका संतप्त शिवसैनिकाने केले ! महापौरांचे स्पष्टीकरण

मुंबई । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो एका शिवसैनिकाचा राग होता. मात्र ती चूकच आहे. मी समज दिली आहे”, असे स्पष्टीकरण आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. एका ट्विटर युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन “तुझ्या बापाला” असे म्हणत आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत.

“मुंबईकराना लस उपलब्ध व्हावी म्हणून ग्लोबल टेंडर काढले गेले आहे. मुंबईकरांच्या १ कोटी लसींसाठी ९ कंपन्या समोर आहेत”, किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती. या वृत्तावर या एका ट्विटर युजरने “काँट्रॅक्ट कोणाला दिले?” असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन “तुझ्या बापाला” असे उत्तर देण्यात आले आहे. या उत्तरानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ह्यावरच आता महापौरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की,

“ट्विटरवर जे काही लिहिले ते मी लिहिले नव्हते. माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. वांद्रे BKC मध्ये कार्यक्रम सुरु होता, तेव्हा मी त्याच्या हातात मोबाईल दिला होता. त्या कार्यकर्त्याला मी समज दिली आहे. ते ट्वीट मी त्वरित डिलीट केले आहे. शिवसैनिक कार्यकर्त्याने तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचेच होते. आरोप करणाऱ्यांनी करत राहावे त्यांचे ते काम आहे. सर्व शहानिशा करुनच टेंडर दिल जाईल. दलाल वगैरे काही नाही”, असेही महापौर पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या थाळ्या पिटण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या आनंद महिंद्रांचा महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनला मात्र विरोध !सामनातून रोखठोक ताशेरे …

News Desk

“महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार का?”, आरोग्यमंत्री म्हणतात…

News Desk

‘दो गज दुरी’ या मंत्राचा वापर करा, पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

News Desk