मुंबई। मुंबईतील रस्त्यांसदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईच्या आयुक्तांनी कामचुकार कंत्राटदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पुढील १५ दिवसांत खड्डेमुक्त मुंबईचे प्रत्यय दिसणार असून २२७ नगरसेवक आपल्या वॉर्डमधील खड्डे भरले आहेत की नाहीत याचा आढावा घेतली, अशा किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
We held a review meeting with BMC Commissioner Iqbal Singh Chahal. Next 15 days are important for pothole-free Mumbai. We hope all potholes will be filled in this period. The 227 councillors will ensure that all potholes are filled in their wards: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/2z5qDUU0U8
— ANI (@ANI) September 29, 2021
तर येणाऱ्या साथीच्या आजाराबाबत या बैठकीमध्ये चर्चा
महापौर म्हणाल्या की, खड्डा किती मोठा-छोटा असा भेदभाव न करता सरसकट ४२ हजाराच्यावर एप्रिल ते आजपर्यंत खड्डे भरले आहेत. अर्थात जे खड्डे भरले ते तसेच राहिले का? की पुन्हा नवीन निर्माण झाले? हिच पाहणी आपण दोन दिवसांपूर्वी केली. आयुक्तांना विनंती आणि निर्देश दिले की, ज्याला आपण रोडचा अधिकारी म्हणतो, त्या अधिकाऱ्याला कोणतेही वेगळे काम न देता (रोड इंजिनिअर) वॉर्ड ऑफिसमध्ये फिरणे, खड्डे बघणे, ते भरणं, त्यासाठी लागणाऱ्या उत्पादनाची मागणी करणे. फक्त रोडची नाही, तर येणाऱ्या साथीच्या आजाराबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली. किटक निर्मुलन, घन कचरा व्यवस्थापन यासंदर्भात बैठक घेतली.
जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेत रस्तेदुरुस्तीचे काम केले जाईल
तसेच किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, आयुक्तांनी कामचुकार कंत्राटदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. तसेच दर आठवड्याला रस्त्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा खड्डा भरला जाईल, तेव्हा त्यावरून कोणतेही वाहन जाणार नाही. यासाठी बॅरिकेट लावून संरक्षित केले पाहिजे, यासंदर्भात सांगण्यात आले. नुसता भरला आणि झालं नाही. जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेत रस्तेदुरुस्तीचे काम केले जाईल. अशावेळी नागरिकांनी काम थांबवू नका. खड्डे भरताना वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.