HW News Marathi
महाराष्ट्र

इको-फ्रेंडली साहित्याला मागणी, सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांची गर्दी

मुंबई | महिन्याभरावर आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी दादरच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. २२ आॅगस्टला आलेल्या सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांनी बुधवारी सकाळपासूनच दादर गाठले. रानडे रस्ता, आयडियलची गल्ली, फूल मार्केट ही दादर बाजारपेठेतील महत्त्वाची ठिकाणे गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. प्लास्टीक बंदीमुळे पर्यावरणविषयक जागृती झाल्याने नागरिक इको-फ्रेण्डली साहित्य खरेदी करीत होते.
गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागताच दादरच्या बाजारपेठा महिनाभर आधीपासूनच सजू लागतात. यावर्षी थर्माकोलच्या बंदीमुळे सध्या दादरच्या बाजारपेठांत पुठ्यांचे, फोम, कापडी अश्या मखरांचे पर्याय उपलब्ध आहेत. हे मखर विकत घेण्यासाठी ग्राहकांची चांगली मागणी होती. सध्या दादरच्या बाजारात दीड फुटापासून ते सहा फुटांपर्यंतच्या कापडी मखरांचे पर्याय उपलब्ध आहेत. हे कापडी मखर कागदी पुठ्ठ्यांचे छोटे-छोटे रॉड करून तयार केले जातात. सध्या या कापडी मखरांची किंमत बाजारात दीड हजार रुपयांपासून ते ८ हजार ५०० रुपयांपर्यंत आहे.
सजावटीच्या वस्तू दाखल –
राज्य सरकारने प्लास्टीक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी घातल्याने या कापडी मखरांची मागणी वाढली आहे. या वर्षी बाजारपेठांत विविध प्रकारचे कंठीहार, मोत्याचे-हिऱ्यांचे हार, मुकुट या प्रमुख आकर्षणाच्या गोष्टी आहेत. बालगणेश ते मोठ्या मूर्तीसाठी बाजारात आलेले फेटेही आकर्षण ठरत आहेत. आरतीसाठी आवश्यक असणाऱ्या समई, धूप, अगरबत्ती, कापूस, तूप आदी वस्तूही विकत घेतल्या जात होत्या.
बाप्पाच्या तयारीसाठी गणेशभक्तांची लगबगही साधारण महिनाभर आधीपासूनच सुरू होते. अनेक गणेशभक्त दादरच्या बाजारपेठेत खरेदी करून कोकणातील आपल्या गावची वाट धरतात. त्यामुळे २२ आॅगस्टच्या सुट्टीच्या दिवशीही बाजारात ग्राहकांची गर्दी होणार हे लक्षात ठेवून दुकानदारांनीही दुकाने सकाळी लवकर सुरू केली होती. तसेच मखर, कंठी, अगरबत्ती, समई, रोशणाईचे सामान, मुकुट, पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी केली होती. अगदी १०-२० रुपयांपासून ते ३० हजार रुपयापर्यंतच्या सजावटीच्या वस्तू या वर्षी दादरच्या बाजारपेठांत आहेत. असे असले तरी प्लास्टीक, थर्माकोल यांच्याऐवजी कापडी, कागदी प्रकार घेण्याला ग्राहकांनी प्राधान्य दिल्याचे दिले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छगन भुजबळ पार्थ पवारांविषयी म्हणतात ..”नया है वह”

News Desk

अजित दादा ,आम्ही पण पाटील आहोत !चंद्रकांत पाटलांनी ठणकावलं !

News Desk

वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे ?

News Desk